शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन फरार अधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: August 26, 2015 00:46 IST

जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध २३ एप्रिल

जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध २३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार महिन्यांपासून फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी सायंकाळी ५ वाजता अटक केली होती. दरम्यान, मंगळवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयाच्या निधीचा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक वैद्य व कर्मचारी खंदारेविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, जालन्यातील महामंडळाच्या कार्यालयाप्रमाणे राज्यातील इतर काही जिल्हा कार्यालयात अपहार झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महामंडळाचे तत्कालीन चेअरमन आ. रमेश कदम यांच्याविरूद्धही मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने या प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीआयडीकडे दिला आहे. त्यानुसार जालना येथील प्रकरणाचा तपास २३ जुलै रोजी कदीम जालना पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. सीआयडीकडे तपास येऊनही हे दोन्ही आरोपी फरार होते. अखेर चार महिन्यांनंतर २४ आॅगस्ट रोजी व्यवस्थापक मधूकर वैद्य याला बीड येथून, तर लिपीक खंदारे याला जालन्यातूनच अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांंगितले. या दोघांना अटक केल्याची नोंद कदीम जालना पोलिस ठाण्यात घेवून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या लॉकअप मध्ये रात्रभर ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता या दोघांनाही सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या लॉकअप मधून न्यायालयात हजर करण्यासाठी नेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वाय.ए. गावडे यांनी दिली.