शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकल्या विद्यार्थिनीवर दोन वेळा अत्याचार

By admin | Updated: August 24, 2016 00:49 IST

औरंगाबाद : शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे.

औरंगाबाद : शाळेतील आठवर्षीय चिमुकलीशी अहेमद खान अमीन खान या नराधम शिक्षकाने अश्लील चाळेच नव्हे, तर दोन वेळा अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. जिन्सी पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष न्यायाधीश एस.एस. नायर यांनी या शिक्षकास २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आझाद चौकात राहणारी आठवर्षीय मुलगी नागसेन कॉलनीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिकते. शाळेतील शिक्षक अहेमद खान (३७, रा. हर्षनगर, मंजूरपुरा) याने चिमुकलीवर दोन वेळा अत्याचार केला होता. ‘अत्याचाराची वाच्यता केल्यास आई- वडिलांना ठार मारीन,’अशी धमकी त्याने मुलीस दिली होती. या घटनेमुळे भेदरलेली मुलगी आजारी पडली होती. आजी व आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, शाळेत छळ होत असल्याचे सांगितले. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सोमवारी दुपारी मुलीला घेऊन शाळा गाठली. अहेमद खान याच्याकडे बोट दाखवून त्यानेच आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी अहेमद खान यास बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने जिन्सी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. सोमवारी रात्री उशिरा मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर दोन वेळा जबरी अत्याचार केल्याचे समोर आले. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात बदल करून बलात्कार केल्याचे कलम लावले. अहेमद खान यास विशेष न्यायाधीश नायर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी २९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.