शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीसाठी अडीच लाखांचे बनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:05 IST

: नगरपालिका पदभरती परीक्षेत पकडण्यात आलेल्या सहा हॉयटेक कॉपीबहाद्दरांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,

जालना : नगरपालिका पदभरती परीक्षेत पकडण्यात आलेल्या सहा हॉयटेक कॉपीबहाद्दरांना न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर एका अल्पवयीन संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या सहा परीक्षार्थींनी अंगात घातलेल्या बनियनची किंमत अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.जालना, अंबड, परतूर व भोकरदन पालिकेच्या विविध ३३ पदांसाठी रविवारी ११ केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जेईएस महाविद्यालयाच्या केंद्रावर लिपीक टंकलेखक पदाचा पेपर देणाºया सहा संशयितांना भरारी पथकाने मोबाईल डिव्हाईसच्या आधारे हायटेक कॉपी करताना पकडले होते, तर सीटीएमके शाळेत एका अल्पवयीन उमेदवाराला दुसºयाच्या नावावर परीक्षा देताना ताब्यात घेण्यात आले. संशयित कृष्णा साहेबराव भवर (राजाटाकळी, औरंगाबाद), कृष्णा रमेश दांडगे (हाळदा, सिल्लोड) , निहालसिंग महाजन सुंदर्डे (शेवगा, फुलंब्री) प्रदीप बदामसिंग सुलाने (तळणी, भोकरदन), प्रदीप हरिओम घुसिंगे (कौचलवाडी, अंबड) विक्रम धरमसिंग जरवाल (कचनेरतांडा) व बुलडाणा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.डिव्हाईसचा चटका बसल्याने भंडाफोडजेईएस केंद्रात परीक्षा सुरू असताना एका परीक्षार्थीला बनियनच्या आतून बसविलेल्या इलेक्ट्रानिक डिव्हाईसचा चटका बसू लागला. त्यामुळे त्याची चूळबूळ सुरू होती. ही बाब भरारी पथकाच्या लक्षात आली अन् हायटेक कॉपीचा भंडाफोड झाला.