शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख कुटुंब उघड्यावर !

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही

आशपाक पठाण , लातूरशौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही लोकांची मानसिकता बदलली नसल्याने जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख कुटुंब उघड्यावर जातात. शौचालयाचे महत्व पटवून देत बांधकामाला परावृत्त करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. टंचाईमुळे रखडलेली कामे पाऊस पडल्यानंतर मार्गी लागतील, या अपेक्षेने जिल्हा परिषदेकडून नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यभरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात गृहभेट अभियान मोहीम हाती घेतली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालयाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. शौचालयाचा वापर हा सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करून देण्याचे काम शासनामार्फत केले जाणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ६१ हजार गृहभेटींद्वारे थेट कुटुंब प्रमुखाशी संंवाद साधला जाणार आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार कुटुंब संख्या असून, यातील १ लाख १६ हजार कुटुंबांकडे अद्यापही शौचालय बांधलेले नाही. शौचालय बांधावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी नियोजन केले असून, वर्षभरात ६१ हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर वाढावा, यासाठी २८४ ग्रामपंचायतींच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जलस्वराज्य, निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून अनेक गावे कागदोपत्री हागणदारीमुक्त झाली. या गावांनी शासनाचे पुरस्कारही घेतले. गावाबाहेर हागणदारीमुक्त गाव असे फलकही झळकले. मात्र हे फलक केवळ दिशाभूल करणारेच ठरले. शासनाचा निधी मिळेपर्यंत दिखावा करणारी गावे आता उघडी पडली आहेत. दुर्गंधीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना शौचालयाबरोबरच आरोग्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पुन्हा शासनावर आली आहे. त्यानुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.