शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

फळबागा वाचविण्यासाठी सव्वातीन कोटी रुपये

By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST

विष्णू वाकडे , रामनगर राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील

विष्णू वाकडे , रामनगरराष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांतर्गत जिल्ह्यातील तीन हजार २८३ लाभार्थी शेतकऱ्यांना २ हजार ५५ हेक्टर क्षेत्राच्या फळपिकासाठी तीन कोटी २८ लाखाचे विशेष पॅकेज अनुदानाचे धनादेश संबंधित बँकेस वितरित करण्यात आल्याचे कृषी विभागाचे एन.एन. नंदवंशी, बी.एन. जोशी (राष्ट्रीय फलोत्पादन) यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विपरित परिस्थितीने फळबागधारक शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्यासाठी सदरील मदत जाहीर झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी करणे, बोर्डोपेस्ट लावणे, किडनाशक फवारणी करणे, आंतरमशागत करणे, सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे तसेच प्लॅस्टिक अच्छादन टाकणे अर्थात पुनरूज्जीवन/पर्णसंभार व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबीचा समावेश होता. सर्व बाबीसाठीचे मंजूर एकत्रित हेक्टरी अर्थसाह्य ५० टक्के प्रमाणे ३६ हजार रुपयांपर्यंत देण्यात आले. यानुसार जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, जिल्ह्यातील मोसंबी बागा वाचविण्यास मोठी मदत होणार असल्याचे बोलले जाते.जालना, अंबड, घनसावंगी, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर, मंठा या सर्व तालुक्यातील कृषी सहायकामार्फत संबंधित लाभार्थ्यांची माहिती तालुका कृषी कार्यालयास देण्यात आली. उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत संबंधित लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम त्याच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वितरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही लाभार्थ्यांचे खातेक्रमांकामध्ये चुका झाल्याने संबंधितांना अर्थसाह्य घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याच्या बाबी समोर येत आहे.लाभार्थी शेतकरी म्हणतात आम्ही तर बरोबर खातेक्रमांक दिला. त्यावर पुढे माहिती पाठविणारेही म्हणतात आम्ही जो नंबर लाभार्थ्यांनी दिला तोच टाकला. तरीही तांत्रिकदृष्ट्या काही उणिवा राहून जातात आणि याचा फटका संबंधित लाभार्थ्यांना बसतो. याचा प्रत्यय दुष्काळी अनुदान वाटपातून दिसून आला आहेच. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फळबागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसाठीचे अर्थसाह्य वितरणाचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल.कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी बँकेच्या आयएफ एससी कोड तसेच बँक खातेक्रमांक अचूक देणे गरजेचे आहे. याची काळजी घेतली जावी, असेही घाटगे यांनी सांगितले.एवढ्या मोठ्या भीषण दुष्काळी परिस्थतीत पारा ४४ अंशाच्या वर चढला असताना विशेष पॅकेज मिळूनही फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावीच लागणार आहे. पाणीपातळी प्रचंड खोल गेल्याने पाण्याचे संकट समोर आहेच. शिवाय भारनियमन व्यतिरिक्त अनेक भागात कृषी पंपांची वीज गायब असते. चार-चार दिवस वीजपुरवठा राहत नाही. यामुळे काहींना पाणी उपलब्ध असूनही जीवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यात मोठा अडथळा निर्माण होतो. सुरळीत वीजपुरवठा होणे गरजेचे असल्याचे बहुतांश फळबागधारक शेतकऱ्यांनी सांगितले.