शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकचे १२९ कोटी थकले

By admin | Updated: June 16, 2016 00:12 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे. सलग तीन वर्ष सरकारने विभागास मंजूर अनुदानापेक्षा कमी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विभागातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे तब्बल १२९ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. शासकीय अनुदानाच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून ठिबक संच बसविलेले आहेत. परिणामी अनुदानच रखडल्यामुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत.शेतीत पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबविले जाते. याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी आधी शेतकऱ्याने स्वत: संपूर्ण रक्कम खर्च करून हे संच बसवायचे असतात. त्यानंतर कृषी विभागाकडून अनुदानाची देय रक्कम अदा केली जाते. मागील काही वर्षांपासून सतत पाण्याचे दुर्भिक्ष भासत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. म्हणूनच अडचणीत असूनही येथील शेतकरी ठिबक संच बसवीत आहेत. मात्र, आता शासनाकडून वेळेत अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे (पान २ वर)एकीकडे सरकार ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते आणि दुसरीकडे त्यांचे अनुदान थकविते हे चुकीचे आहे. विभागातील असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ठिबक संच बसविले होते. अजूनही त्यांना अनुदान मिळालेले नाही. शासन त्यावर निर्णय घेत नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना