शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत पुन्हा मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 23:48 IST

जालना : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला असून, यंदाही मुलीनींच बाजी मारली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर झाला असून, यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.४९ टक्के इतका लागला. मराठवाड्यात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या सुमारे २६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २६ हजार ९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी मंगळवारी जाहीर झालेल्या आॅनलाईन निकालात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल कसा लागेल या भीतीने मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. तर स्मार्ट फोनमुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच निकाल पाहिला. यावर्षी औरंगाबाद विभागाचा निकाला ८९.८३ टक्के लागला आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, परभणी नंतर जालन्याचा क्रमांक येतो. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा ९५.३२ कला शाखेचा ८३.४८ टक्के तर कॉमर्सचा ८८.९३ टक्के निकाला लागला आहे. मराठवाड्यात जिल्हा गुणवत्तेत मागे राहिला असला तरी गतवर्षी ८७ टक्के असलेला निकाल यंदा ८८.४९ टक्के इतका लागला आहे.