शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उलाढाल मंदावली

By admin | Updated: November 13, 2016 00:27 IST

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत.

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत. सलग चौथ्या दिवशी व्यापारपेठेत प्रचंड शुकशुकाट जाणवला. कोट्यवधींची उलाढाल हजारापर्यंत गडगडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची झळ व्यापाऱ्यांना पोहोचली आहे.चार दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे व्यापारपेठेत पैशांची चणचण जाणवत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये लांबलचक रांगा लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अडीच लाखापर्यंतच्या व्यवहारापर्यंत अडचणी नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. अनेकांना लाखोंचे व्यवहार समोर येऊ नये असे वाटत आहे. त्यामुळे उसनवारी व उधारीवरच बहुतांश व्यवहार सुरू आहेत. दोन हजार रूपयांच्या नोटा काहींना मिळाल्या असल्या तरी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. पाचशे-हजार रूपयांच्या नोटा कोणी स्वीकारायला तयार नाही. तसेच दोन हजार रूपयांच्या नोटेच्या चिल्लरचे वांधे आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवहार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.कूपन २००, नोटा १५० जणांनाचअंबाजोगाईमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांना संपूर्ण दिवस खर्ची करावा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून २०० जणांना कूपन वाटप केले जात आहे. मात्र, दिवसभरात केवळ १५० जणांनाच नोटा बदलून मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांना रिकाम्या हाती परत फिरावे लागत आहे.एटीएमवर ग्राहकांच्या चकराबँकेमध्ये रांगा आहेत. त्यामुळे खात्यावर जमा असलेले पैसे काढणे ग्राहकांना अवघड बनले आहे. त्यात एटीएमचे शटर चार दिवसांपासून डाऊनच आहे. काही ठिकाणचे एटीएम सुरू आहेत. मात्र, तेथेही तोबा गर्दी आहे. एटीएम सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा असून, ग्राहकांच्या चकरा सुरू आहेत.एसटीच्या उत्पन्नावर परिणामपाचशे-हजार रूपयांच्या नोटांद्वारे एसटीमध्ये केवळ आरक्षित तिकीट काढता येत आहे. वाहक अशा नोटा स्वीकारत नाहीत. दोन हजारांची नवीन नोट दिली तर परत सुटे देण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे एसटीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)