शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:58 IST

शेतकºयांना कुठलीही अट न लावता आजपर्यंत थकीत व सरसगट कर्ज माफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतकºयांना कुठलीही अट न लावता आजपर्यंत थकीत व सरसगट कर्ज माफी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम करण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलकांना अटक करण्यात आली तर काही ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनात शेतकºयांसह विविध संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला. कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वत्र कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सोमवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील पूस, धायगुडा पिंपळा, गिरवली या मुख्य रस्त्यावर शेतकºयांनी बैलगाड्या रस्त्यावर लावून चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. अंबाजोगाई-गिरवली-पूस या रस्त्यावर तालुक्यातील शेतकºयांनी बैलगाडया मुख्य रस्त्यावर लावून चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे अंबाजोगाई तालुक्यात या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, बबन आपेट, पटेल यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.माजलगाव शहरातील शिवाजी चौकात पहिले आंदोलन सुकाणु समितीच्यावतीने करण्यात आले. या ठिकाणी सकाळी आंदोलन सुरु झाले. त्यावेळी आंदोलनात अनेकजण सामिल झाले होते. जवळपास एक तास हे आंदोलन चालल्यानंतर तहसीलदार एन.जी. जंपलवाड यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर परभणी टी. पॉर्इंट येथे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याठिकाणी परभणी, माजलगाव आणि तेलगावकडुन येणाºया वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. रस्त्यावर बैलगाडया आडव्या लावुन हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी जवळपास दीड तास वाहतुकीचा खोळंबा झालेला पहावयास मिळाला. तसेच घोषणाबाजी देखील करण्यात आली. छोटीवाडी, तालखेड फाटा येथेही आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात मोठया प्रमाणावर शेतकरी तथा विविध संघटनांचे पदाधिकारी सामिल झाले होते. प्रचंड घोषणाबाजीने शासनाच्या कर्जमाफी विरोधात शेतकºयांनी आवाज उठवला. तालखेड फाटा येथील आंदोलनात सुमारे दीड तास राष्ट्रीय महामार्ग क्र .२२२ हा बंद राहिल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.जिल्हाधिकाºयांना दिले निवेदनबीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात प्रा. सुशीला मोराळे, कुलदीप करपे, मोहन लांब, राजाभाऊ देशमुख, ज्योतीराम हुरकुडे, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, गणेश मस्के, संगमेश्वर आंधळकर, पंकज चव्हाण, आशा कांबळे आदी सहभागी होते.