शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

लोटाबहाद्दरांना कचऱ्याच्या गाडीतून शहरभर फिरविले

By admin | Updated: February 5, 2017 23:32 IST

उमरगा : नगर पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास लोटाबहाद्दरांविरुद्ध अचानक कारवाई मोहीम हाती घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली़

उमरगा : नगर पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास लोटाबहाद्दरांविरुद्ध अचानक कारवाई मोहीम हाती घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली़ पथकाने ३१ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांना घंटागाड्यात बसवून शहरातून फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. संबंधितांच्या नातेवाईकांनी सकाळी-सकाळी पोलीस ठाणे गाठून एकच गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़उमरगा पालिकेकडून गत वर्षभरापासून स्वछ महाराष्ट्र अभियानातंर्गत घरगुती शौचालय योजना राबविण्यात येत आहे़ घरगुती शौचालयाचा वापर करावा, यासाठी पालिकेकडून अभियान हाती घेण्यात आले आहे़ उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर भल्या पहाटे गुडमॉर्निंग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही अनेकजण उघड्यावर शौचास जात आहेत़ त्यामुळे पालिका प्रशासनाच्या गुडमॉर्निंग पथकाने रविवारी पहाटे शहराच्या विविध भागात उघड्यावर शौचास बसलेल्या ३१ जणांना पकडले़ त्यानंतर त्यांच्या गळ्यात हार घालून घंटागाड्यातून संपूर्ण शहरभर त्यांना फिरवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ या प्रकारामुळे संतापलेल्या संबंधितांच्या नातेवाईकांनी ठाण्यात धाव घेऊन गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ कारवाई करून सोडणे गरजेचे असताना घंटागाड्यांमधून फिरवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला़ हा घंटागाड्यांमधून फिरविण्याचा प्रकार किंवा कारवाई कोणत्या आधारावर, कोणत्या नियमावर केली असे म्हणत अनेकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ त्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई सोडून देण्यात आले़ यावेळी मुख्यधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी होते़ या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, घंटागाड्यातून फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)