शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

शहरातील बंद असलेले ट्रान्सफार्मर चालू करा

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

अहमदपूर : शहरात वेळोवेळी सुरू असलेले भारनियमन बंद करावे व शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर तात्काळ चालू करावे, अशा मागणीसाठी शिवसेना अहमदपूर शाखेच्या वतीने महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.

अहमदपूर : शहरात वेळोवेळी सुरू असलेले भारनियमन बंद करावे व शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर तात्काळ चालू करावे, अशा मागणीसाठी शिवसेना अहमदपूर शाखेच्या वतीने महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.अहमदपूर हे मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. या ठिकाणी सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुले शिक्षणासाठी येतात. परंतु, शहरामध्ये सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये भारनियमन होत असते. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उष्णतेला सामोरे जावे लागत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त दिवसातून अनेकवेळा वीज जात असल्याने अहमदपूर शहरात चोऱ्या, छेडछाडीचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, यावर उपाययोजना करण्याऐवजी महावितरण या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे. तोंडावर आलेली पेरणी, सुरू असलेली लगीनसराई व शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ यामुळे बाजारात लोकांची वर्दळ दिसून येत आहे. वाढत्या भारनियमनामुळे, व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी आहे. त्यामुळे वाढते भारनियमन त्वरित रद्द करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कार्यालयास दिलेल्या निवेदनात करण्यात आला. निवेदनावर तालुकाध्यक्ष बालाजी रेड्डी, प्रल्हाद पुणे, सुदर्शन हामणे, शंकर चोले, राम जाधव, सुनील हलसे, वैभव शेटकार, सचिन ढाकणे, राजेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)