लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नेकनूर परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असणाºया बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद केली आहे. अवजड वाहने मोंढा मार्गे, तर छोटी वाहने शहरातून वळविण्यात आली आहेत.रविवारी दुपारपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बिंदुसरा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. मोठा पूल अगोदरच बंद करण्यात आला आहे. पर्यायी पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद केली आहे. घटनास्थळी वाहतूक शाखेसह शिवाजीनगर, पेठ बीड ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. शहरातून वाहतूक वळविल्याने कोंडी होत आहे.
बिंदुसरा नदीवरील वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:29 IST