शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

लोकसभा निकालामुळे तुळजापूरचे गणितही अवघड

By admin | Updated: June 12, 2014 01:39 IST

संतोष मगर , तामलवाडी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे.

संतोष मगर , तामलवाडीतुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे. तालुक्यात स्थानिक संस्थावर काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ३५ हजारांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळाले आहे. आजवर तुळजापूरचा आमदार हा धोतर नेसणाराच निवडून देण्याची परंपरा मतदारांनी जोपासली आहे.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना ११०० मतांनी आघाडी तुळजापूर मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी खा. रवींद्र गायकवाड यांच्या पारड्यात या मतदारसंघाने ३५ हजारांचे मताधिक्य टाकले. त्यामुळे मतदारराजा पुन्हा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पाठीशी राहील, हे राजकीय गणित मांडणे सध्यातरी धोक्याचे आहे. केंद्रात महायुतीची सत्ता आल्याने तुळजापूर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. तुळजापूरची जागा महायुतीच्या कोट्यातून भाजपासाठी सुटली. सध्या महायुतीचा उमेदवार कोण, हे स्पष्ट नाही; पण पालकमंत्री चव्हाण, देवानंद रोचकरी हे दोघे जण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सलग १५ वर्ष तालुक्यात झालेली विकास कामे, स्थानिक संस्थावर असलेले वर्चस्व यातून विद्यमान आमदाराला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत रोचकरी यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता.तुळजापूर विधानसभा मतदार संघात उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावांचा समावेश तुळजापूरमध्ये असल्याने सर्वच राजकीय उमेदवारांना प्रचाराला जोरा द्यावा लागणार आहे. तुळजापूर पंचायत समितीवर स्वतंत्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर बाजार समिती, साखर कारखाना, सूतगिरणी या संस्थावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र महायुतीकडे सध्या कोणतीही सत्तास्थाने नाहीत. त्यामुळे मातब्बरांसमोर कोण टक्कर देणार याकडे लक्ष लागले आहे. तुळजापूर तालुक्याला जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद मिळाल्याने काँग्रेसने जि.प.तील सत्ता कायम ठेवली आहे. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत दाखल झालेले अ‍ॅड. दीपक आलुरे, वसंत वडगावे यांच्यामुळे काय परिणाम होतो, हेही पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अपक्ष उमेदवार रोहन देशमुख काय भूमिका घेणार यावरही लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. गत निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील ७१ गावांतून सुभाष देशमुख यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. लोकसभा महायुतीने एकहाती जिंकली असली तरी विधानसभेची लढत वाटते तेवढी सोपी नाही एवढे मात्र नक्की. निवडून गेलेले सर्व आमदार धोतरवालेसाहेबराव आबा हंगरकर, शिवाजीराव पाटील बाभळगावकर, माणिकराव भीमराव खपले, सिद्रामप्पा नागप्पा आलुरे, मधुकरराव देवराव चव्हाण.२००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्नमधुकरराव चव्हाण : ६५,८०२सुभाष देशमुख : ४९,४६९देवानंद रोचकरी : ४५,९४२अरविंद गोरे : १५,६६५अर्जुन सलगर : ४९९९