शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:36 IST

महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची १४ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरात होर्डिंग्ज, मॅसेजद्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांचीही मदत घेतली जाणार असून शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांची १४ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या वतीने बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ११ आॅक्टोबर रोजी होणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, एनएसएसचे प्राध्यापक, स्काऊट गाईड, एनसीसीचे सर्व कॅडेट यांची बैठक १४ सप्टेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्त देशमुख यांनी केले.दरम्यान, मंगळवारी महापालिका निवडणुकीत उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. या संदर्भात उमेदवारांनी अर्ज कसे भरावेत याबाबतची माहिती इंटरनेट कॅफे चालकांना देण्यात आली. सेतू सुविधामार्फत चालणाºया केंद्र चालकांना मंगळवारी महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये फॉर्म भरताना येणाºया तांत्रिक अडचणी, विशिष्ट शब्दाचे अर्थ आयुक्तांनी विस्तृतपणे सांगितले. यावेळी उपायुक्त संतोष कंदेवार यांची उपस्थिती होती. या संगणक चालकांना १४ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे.१६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून उमेदवारांनी शेवटच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी न करता प्रारंभीपासूनच अर्ज भरावेत. अर्ज भरताना संपूर्ण माहिती भरावी. तसेच खोटी माहिती सादर करु नये, असेही त्यांनी सांगितले. शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. रस्त्यावर कुठेही होर्डिंग्ज नसून शहरात कुठेही एकही होर्डिंग्ज विनापरवाना नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. याबाबत क्षेत्रीय अधिकाºयांचे शपथपत्र घेण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयुक्त जे़एस़ सहारिया आज नांदेडातराज्य निवडणूक आयुक्त जे़एस़ सहारिया हे १३ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये येत आहेत. आयुक्त सहारिया यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका निवडणुकीचा व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीस जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नोडल आॅफिसर, निवडणूक अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आयकर अधिकारी उपस्थित राहतील.