शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कर्जमुक्तीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:08 IST

महापालिकेकडे २०१३ पासूनचे कंत्राटदारांचे देयके थकित आहेत. ही देयके अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच कर्जातून विकास करण्याचे प्रयत्न मनपा करणार नसून पहिल्यांदा महापालिका कर्जमुक्तीसाठी पावले उचलेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देकर वसुलीला गती : जुनी देणी अदा करुन नव्या कामांना गती देणार

हरात आजघडीला प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन वाहनातून नव्हे, तर पायी चालणेही कठीण झाले आहे. महापालिकेने कामांच्या निविदा काढल्या असल्या तरीही त्यांना मिळणाºया प्रतिसादाचाही विचार करावा लागणार आहे. शासनाने महापालिकेला दीडशे कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. यातील ५० कोटींच्या रकमेतून जुने जादा व्याजदर असलेले कर्ज महापालिकेने फेडले आहे. कमी व्याजदराने आवश्यक ते कर्ज घेतले आहे.त्याचवेळी शहरात असलेल्या जेएनएनयुआरएम आणि नगरोत्थान योजनेतील अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने कर्ज मंजूर केले आहे. या मंजूर केलेल्या कर्जातून महापालिका तीच अर्धवट कामे पूर्ण करु शकणार आहेत. कर्ज देताना शासनाने ती अटच घातली आहे. त्यामुळे अन्यत्र निधी खर्च करणे ही बाब प्रशासनाच्या अंगलट येणार आहे. आगामी काळात प्रशासनाला अंगलट येणारी कामे करणे म्हणजे कारवाईला निमंत्रण देणेच ठरणार आहे.महापालिकेची आजघडीची आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ करणे अपरिहार्य आहे. त्यात आहे त्या करवसुलीची गती वाढवली जाणार आहे. मंगळवारी कर वसुलीसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर वसुलीला गती देण्याचे आदेश दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले. या कर वसुलीतून जुनी देणी अदा करुन नव्या कामांना प्रारंभ केला जाईल. शहरातील प्रमुख कामे निश्चितपणे केली जाईल मात्र कर्जातून विकास हा पर्याय आजघडीला तरी महापालिकेला परवडणारा नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.