परळी : शहरातील पंचवटीनगर भागात एका व्यापाऱ्याच्या अंगावर मिरची पूड फेकून लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडली.प्रकाश कांकरिया (रा. पंचवटीनगर, परळी) यांचे मोंढा भागात किराणा दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून ते दुचाकीवरून घराकडे जात होते. पंचवटीनगराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या अंगावर मिरची पूड फेकली. त्यानंतर हातातील बॅग हिसकावून नेली. मात्र त्यात रोख रक्कम नव्हती. केवळ नोंदवह्या होत्या. या घटनेने व्यापाऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. (वार्ताहर)
मिरची पूड फेकून लुटण्याचा प्रयत्न
By admin | Updated: May 15, 2015 00:50 IST