शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

विषारी औषध पाजवून मारण्याचा प्रयत्न; चौघांना शिक्षा

By admin | Updated: March 13, 2015 00:39 IST

जालना : विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव ता.जि. औरंगाबाद येथील कपूरचंद आनंदराव काबरा व अन्य तीन आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. देशमुख

जालना : विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव ता.जि. औरंगाबाद येथील कपूरचंद आनंदराव काबरा व अन्य तीन आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. देशमुख यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय १२ मार्च रोजी दिला.पाचनवडगाव (ता. जालना) येथे ९ आॅक्टोबर २००९ रोजी सकाळी ९.३० वाजता सुनील खंदारे व त्यांची पत्नी नीता हे त्यांच्या शेतात काम करत असताना आरोपी संगनमत करून तेथे आले. कपूरचंद यांनी सुनील खंदारे यांची गळचेपी धरली. त्यानंतर श्याम काबरा व सुनीता काबरा यांनी मोटारसायकल नीता यांच्या अंगावर घातली. बाटलीतील औषध सुनील यांना पाजले. या प्रकारानंतर सुनील व त्यांच्या पत्नीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात आरोपी कपुरचंद आनंदराव काबरा, श्याम कपुरचंद काबरा, सुनीता श्यामसिंग काबरा, वैशाली श्यामसिंग काबरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, डॉ. संजय कुलकर्णी, तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक एस.एन. शेख यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उपलब्ध पुराव्यानुसार न्यायाधिश देशमुख यांनी वरीलप्रमाणे निर्णय दिला. ४घनसावंगी येथील मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य संभाजी पाटील यांच्याविरूद्ध विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार झाले होते. घनसावंगी पोलिसांना पाटील हे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक पवार, पो. कॉ. शेख अक्तर, राऊत, धाईत यांच्या पथकाने सिडको बसस्थानकावरून त्यांना सकाळी अटक केली. सांयकाळी घनसावंगी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.