शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विकेंद्रित साठा निर्मितीचा प्रयत्न व्हावा

By admin | Updated: March 17, 2016 00:12 IST

नांदेड :जलसंवर्धनासाठी कमी खर्चात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, पाण्याचा थेंबन्थेंब अडवून विकेंद्रित जलसाठ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील,

नांदेड :जलसंवर्धनासाठी कमी खर्चात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, पाण्याचा थेंबन्थेंब अडवून विकेंद्रित जलसाठ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले. नियोजन भवन येथे जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन कलश पूजनाने करण्यात आले. गोदावरी पाटबंधारे आणि उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी, व्ही. टी. तांदळे, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. तुकाराम मोटे, कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी, एस. एच. कचकलवार, एस. व्ही. पडलवार, एम. टी. लव्हराळे, बी. के. शेट्टे, मोहमंद जमील, आर. आर. बारडकर, एम. एल. उप्पलवाड, राजगिरे, शाहू यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन या बदलत्या शेतीच्या संकल्पनेमुळे खर्च वाढला. नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थित व्यवस्थापन न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे मृदसंधारण आणि जलसंधारण या दोन्हीवरही प्रतिकूल परिणाम झाला. भूगर्भातील पाण्याचा अमाप उपसा झाल्याने शेतीसाठीचे धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची वेळ आल्याचे जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले. त्यासाठी अभियंत्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील जलस्त्रोतांचे, जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन व त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी सूचित केले. कृषी अधीक्षक मोटे यांनी माती व पाण्याचा अतुट संबंध असून त्यासाठी जलसंवर्धनासाठी मृदसंधारणाचाही प्राधान्याने विचार करावा असे सांगितले. प्रास्ताविकात अभियंता स्वामी यांनी केले़ जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांतून आणलेल्या पाण्याच्या कलशाचेही जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. उपस्थितांना जलसंवर्धनासाठी जलप्रतिज्ञा देण्यात आली. (प्रतिनिधी)