औरंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची धडक लागल्यामुळे स्कूटीस्वार तरुणी, तरुणी गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक रोडवर मिटमिट्याजवळ झाला. जखमींमध्ये प्रशांत शामराव चव्हाण (२५, रा. मुकुंदवाडी, रामनगर) व स्वाती राहुल फुके (२५, रा. शिवशंकर कॉलनी) यांचा समावेश आहे. दोघांनाही उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत आणि स्वाती हे दोघे स्कूटी (क्र. एमएच-२० सीडी- ४०२२) वर बसून खुलताबादला गेले होते. तेथून परतत असताना मिटमिट्याजवळ सपना ढाब्याजवळ त्यांच्या स्कूटीला समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. जीजे- ०८ डब्ल्यू- १८६६) ची धडक लागली. या अपघातात प्रशांत आणि स्वाती दोघे खाली पडले आणि ट्रकच्या चाकाखाली आले. त्यामध्ये दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी छावणी ठाण्यात नोंद करण्यात आलीे.
ट्रक- स्कूटीच्या धडकेत तरुण, तरुणी गंभीर जखमी
By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST