हिंगोली : भरधाव ट्रकची दुचाकीस जोराची धडक बसल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हिंगोलीतील कयाधू नदीजवळ घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतुक पिंपरी येथील अनिल ओंकारबुवा पर्बत आणि राहुल सुर्यवंशी हे दोघे गुरूवारी दुपारी दुचाकी क्र. एम. एच. ३८ एम- ४५०४ वरून हिंगोलीकडे निघाले होते. शहराजवळील कयाधू नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या ट्रक क्र. २४ एफ -९८२२ च्या चालकाने वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात अनिल पर्बत आणि राहुल सुर्यवंशी यांना गंभीर दुखापत झाली असून हिंगोली येथे जिल्हा शासकीय रूग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. सूर्यवंशी यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नांदेडला हलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अनिल पर्बत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ट्रकची दुचाकीस धडक; दोघे गंभीर जखमी
By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST