शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

ट्रकची दुचाकीला धडक; आजीसह नातवाचा जागीच मृत्यू

By admin | Updated: March 18, 2017 23:43 IST

उस्मानाबाद : ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने आजीसह तिच्या दीड वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला़

उस्मानाबाद : भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका आजीसह तिच्या दीड वर्षाच्या नातवाचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी सकाळी उस्मानाबाद-औसा राज्य मार्गावरील समुद्रवाणी पाटीजवळ घडली़सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी तांडा येथील अंबादास भगवान पवार हे शनिवारी सकाळी त्यांची आई इंदूबाई भगवान पवार (वय-४५) व पुतण्या नागेश्वर अमोल पवार (वय दीड वर्ष) यांना मोटारसायकलवर (एमएच-०३/जे-५९८१) घेवून तांड्याकडे येत होते. समुद्रवाणी पाटीहून वळण घेवून औसा रस्त्याने येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच-२५/बी-९२४८) जोराची धडक दिली़ या अपघातात इंदूमती पवार व दीड वर्षीय नागेश्वर अमोल पवार हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. या अपघातात मोटारसायकलस्वार अंबादास पवार हे मात्र बालंबाल बचावले़ अपघातानंतर ट्रकमधील वऱ्हाडी मंडळींपैकी एकानेही अपघातग्रस्तांची मदत केली नाही. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला़ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे व बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे, पोलीस नाईक एस. एस. सुरवसे, पोलीस हवालदार एच. एस. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. मयत इंदूबाई पवार व नागेश्वर पवार यांचे प्रेत पाडोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. जखमी अंबादास पवार यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांच्या माहितीवरून ट्रकचालकाविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)