कळमनुरी : विरूद्ध दिशेने चालवित असलेल्या आॅटोला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. कळमनुरी - नांदेड रस्त्यावर कळमनुरी शहरात १९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीवरून मंगळवारी कळमनुरी शहरात एमएच-३८ ५८१४ क्रमांकाचा आॅटो चालक विरूद्ध दिशेने वाहन चालवित होता. दरम्यान भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असताना आॅटो ट्रकला घासल्याने अपघात झाला. त्यात जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. त्यानंतर पोना कल्पना चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आॅटो चालक चांदू किसन आजादे याच्याविरूद्ध कळमनुरी पोलिसता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठोंबरे, फुगनर करीत आहेत.
ट्रक-आॅटो धडक; तिघे जखमी
By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST