शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी तूर खरेदी ठप्प

By admin | Updated: February 4, 2017 23:33 IST

बीड तुरीची खरेदी चार दिवस बंद ठेवण्याची नामुश्की ओढवली आहे.

राजेश खराडे बीडजिल्ह्यात कृउबाच्या ठिकाणी ‘नाफेड’च्या वतीने तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली असली तरी गेल्या पंधरा वर्षांपासून तुरीची विक्रमी आवक झाली आहे. गोदामात माल ठेवण्यास जागा अपुरी पडत असून, कृउबा परिसरातही अशीच अवस्था असल्याने तुरीची खरेदी चार दिवस बंद ठेवण्याची नामुश्की ओढवली आहे.२२ डिसेंबरपासून बीडसह इतर ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. शासकीय खरेदी केंद्रांवर तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपये तर खासगी केंद्रांवर ४ हजार १०० रुपये भाव मिळतो. शासकीय केंद्रांवर धनादेशासाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागते. खासगी केंद्रांवर मात्र रोखीने व्यवहार होतात.अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. खरेदी केंद्रावर पांढरी, लाल व काळ्या तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दिवसाकाठी जवळपास २ हजार क्विंटल आवक होत असल्याचे येथील केंद्रप्रमुख बी.बी. दहीफळे यांनी सांगितले. आठवड्याच्या सुरुवातीला पोत्यांअभावी दोन दिवस खरेदी ठप्प होती, तर आता जागेअभावी रविवारपासून बीड खरेदी केंद्रावर खरेदी-विक्री थांबविली असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी कृउबाला अधिकृत पत्रही देण्यात आले आहे. बीड तालुक्यासह गेवराई, शिरूरमधून तुरीची आवक होत आहे. सर्व काही सुरळीत असतानाच आता चार दिवस खरेदी केंद्र बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. यापूर्वीही बारदानाअभावी खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले होते. धनादेशासाठी वेटिंगमोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असल्याने नाफेडकडे खरेदी केलेला माल जाण्यास विलंब होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे धनादेश काढण्यातही उशीर होत असून, १५ दिवसांऐवजी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी खेटे घालत आहेत. जिल्हा मार्केटिंग कार्यालयात धनादेश दाखल होत असून, तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.