शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तिप्पट पाऊस; त्यानंतरही प्रतीक्षा

By admin | Updated: July 28, 2016 00:50 IST

उस्मानाबाद : मागील १ जून ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या २८१.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : मागील १ जून ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाच्या २८१.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा मागील वर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसाच्या सुमारे तिप्पट आहे. मागील वर्षी या कालावधीत ९५.५२ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी त्या तुलनेत चांगला पाऊस असला तरी तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याला आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.यंदा १ जूनपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मोठा पाऊस नसला तरी रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे अनेक भागातील पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना सुटला आहे. उस्मानाबाद तालुक्यात २२९.६९, तुळजापूर ३६२.९८, उमरगा ३४३.२०, लोहारा २८८.६६, कळंब २०५.५०, भूम २९२.८०, वाशी २६१.३४, तर परंडा तालुक्यात २७ जुलै पर्यंत २६८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यात १६.८८, तुळजापूर ७.१४, उमरगा ३२.२०, लोहारा १७.३३, कळंब ३०.३३, भूम २३.२०, वाशी २१.३३, तर परंडा तालुक्यात ७.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील जळकोट मंडळामध्ये २५ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर उमरगा आणि मुरूम येथे २० आणि २९ मि.मी. पाऊस नोंदविला गेला. लोहारा तालुक्यातील माकणी येथेही मंगळवारी ३५ मि.मी. पाऊस झाला. कळंब तालुक्याला जुलै महिन्यामध्येही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी कळंब भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. कळंब शहरात ५० मि.मी., शिराढोणमध्ये ५२, तर येरमाळा मंडळामध्ये ३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. अशीच परिस्थिती भूम तालुक्यातही होती. तालुक्यातील आंबी येथे ५२ मि.मी., तर भूम शहरात २७ मि.मी. पाऊस झाला. वाशी शहरातही मंगळवारी ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, परंडा तालुक्यातील आनाळा मंडळात ३१ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. (प्रतिनिधी)