शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्पर्धेत साक्षीचा पदकांचा तिहेरी धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:17 IST

राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे. साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे तिने ४ बाय १०० मीटर रिले धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादच्या अ‍ॅथलिटने १०० मी. धावण्याची शर्यत, रिलेत जिंकले सुवर्ण : २०० मी.मध्ये मिळवले रौप्यपदक

औरंगाबाद : राष्ट्रीय पातळीवर पदकांची लूट करणारी औरंगाबादची साक्षी चव्हाण हिने आपला पदकांचा धमाका सुरू ठेवताना रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी तीन पदकांची कमाई करताना विशेष ठसा उमटवला आहे.साक्षी चव्हाण हिने आज २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे तिने ४ बाय १०० मीटर रिले धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले आहे. याआधी याच स्पर्धेत औरंगाबादच्या या अ‍ॅथलिटने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १२.५२ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या संघात औरंगाबादच्या साक्षी चव्हाण हिच्यासह मुंबईच्या सानिया सावंत, अहमदनगरची दिव्यांगी लांडे, मुंबईची त्रिवेणी तावडे यांचा समावेश होता. रिलेत रौप्यपदक हे तामिळनाडूला मिळाले आहे. गेल्या वर्षभरापासून आपला विशेष ठसा उमटवणाºया साक्षी चव्हाण हिने गतवर्षी डिसेंबरमध्ये तिरुपती येथील राष्ट्रीय स्पर्धेतही १४ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. याच स्पर्धेत साक्षीने केरळच्या मंजिदा नोव्हरीन हिचा राष्ट्रीय स्पर्धेतील १२.७३ सेकंदाचा विक्रम मोडीत काढताना १२.३८ ही नवीन वेळ नोंदवली होती. त्याचप्रमाणे तिने २०१८ मध्ये जानेवारी महिन्यात रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत २०० मी. मध्ये सुवर्ण व १०० मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकताना पदकांचा डबल धमाका केला होता. साक्षी चव्हाण ही सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिला प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व पूनम नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य राजाराम दिंडे यांनी साक्षी चव्हाण हिचे अभिनंदन केले.