लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरात शुक्रवारी तृतीयपंथियांच्या टोळीने नागरिकांना अडविले. तसेच त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. तर बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचे स्वीय सहायक श्रीराम जाधव यांच्या हातातून २२ हजार रुपये असलेली बॅग हिसकावली. वेळीच नागरिकांनी पकडून त्यांना चोप दिला. पोलीस येण्यापूर्वीच त्यांनी पळ काढला.शहरात तृतीयपंथियांचा वावर सतत वाढत आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास शिवीगाळ करतात. कशाला नादी लागायचे म्हणून नागरिक पैसे देऊन सुटका करून घेतात. रस्त्यावरून पायी, दुचाकीवरून जा-ये करणाºया लोकांना अडवून त्यांच्याकडून बळजबरीने खिशात हात घालून पैसे लुटीत होते. हा प्रकार तात्काळ पोलिसांना कळवला. आंबेडकर चौक ते नवीन पाणी टाकीपर्यंत हा प्रकार सुरू होता. यावेळी नगारिकांनी पैसे हिसकावणाºया दोन तृतीयपंथियाना पकडून चोप दिला. यावेळी या तृतीयपंथियांनी गर्दीतून सुटका करून घेत धूम ठोकली.
तृतीयपंथियांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:44 IST