बदनापूर : तालुक्यातील देवगाव येथील शेळी व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून ४९ हजार रूपये लुटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. देवगाव (ता बदनापूर )येथील शेळी व्यापारी पाथर्डी ता. शेवगाव जि. नगर येथे शेळ्या खरेदीकरिता जात असताना त्यांचे वाहन (क्र एम.एच ११ टी ६४१४) दोन मोटार सायकलवरून आलेल्या चोरट्यांनी अडविले. या गाडीचा काच फोडला. व्यापाऱ्यास चाकुचा, शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या जवळील ४९ हजार रूपये लुटून पोबारा केला. सदर प्रकरणी या गाडीचा चालक संजय अशोक कोल्हे रा. देवगाव(ता.बदनापूर) यांच्या फिर्यादीवरून चार चोरट्यांविरूध्द बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास बदनापूर पोलिस करीत आहेत. बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील बसस्टँडवरून दि. १४ नोव्हेंंबर रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान मोटार सायकल( एम एच २१ अेके ०१७९ ) ही ४० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदर प्रकरणी रामेश्वर केशवराव राऊत यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
व्यापाऱ्यास चाकुचा धाक दाखवून लुटले
By admin | Updated: November 25, 2015 23:17 IST