शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
3
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
4
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
5
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
6
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
7
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
8
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
9
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
10
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
11
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
12
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
13
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
15
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
16
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
17
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
18
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
19
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
20
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

सिल्लोड तालुक्यात तिरंगी लढत

By admin | Updated: February 4, 2017 14:46 IST

सिल्लोड तालुक्यात 8 जिल्हा परिषद गटात काँग्रेसने 08, भाजप 08,शिवसेनेने 07 गटात उमेदवार उभे केले आहे.

ऑनलाइन लोकमत/श्यामकुमार पुरे

सिल्लोड, दि. 4 - सिल्लोड तालुक्यात 8 जिल्हा परिषद गटात  काँग्रेसने  08, भाजप 08,शिवसेनेने 07 गटात उमेदवार उभे केले आहे. तर राष्ट्रवादीने आठ पैकी केवळ 4, बसपा 4, एमआयएम 2, संभाजी ब्रिगेड 2, स्वाभिमानी 1, असे उमेदवार उभे केल्याने काही गटात तिरंगी लढत तर काही गटात चौरंगी पंचरंगी लढत होईल, असे चित्र दिसत आहे.निवडणूक पूर्वी स्थबळाची भाषा करणाऱ्या विविध पक्ष च्या अनेक मातबराना उमेदवार न मिळाल्याने ते तोड़ घशी पडले आहे.तर काही पक्ष अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे.
 
पंचायत समिती 16 गणात कोणत्या पक्षाने किती उमेदवार उभे केले
काँग्रेस 16, भाजप 16, शिवसेना 12, रास्ट्रवादी 6, स्वाभिमानी 1, बसपा 3, एम आय एम 4, संभाजी ब्रिगेड 6 असे आहे. यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख तीन पक्षात 16 गणात तिरंगी लढत होईल.तर काही गणात रास्ट्रवादी, एमआयएम, बसपा, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी या पक्षाचे उमेदवार निर्णायक ठरणार आहे.
 
मनसे गायब 
सिल्लोड तालुक्यात मनसे या पक्षाने एकही उभा केला नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष कमलेश कटारिया हे मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याने तालुक्यात मनसे गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या जि.प,प.स.निवडणुकीचे वारे तालुक्यात जोरात वाहत आहे. प्रत्येक नागरिकांच्या ओठी निवडणुकीचीच चर्चा आहे. तर या निवडणुकीत कोणता पक्ष सरस ठरणार तर कोण आपटणार,कोणता पक्ष कोणाचे गणित बिघडवणार, असे राजकीय तर्क वितर्क लढविले जात आहे.
 
परंतु निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याआधी सर्वच पक्षांनी 'एकला चलो'चा नारा दिला होता. परंतु उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ काँग्रेस, भाजपाने तालुक्यातील संपूर्ण आठ गट व 16 गणात प्रत्येकी चोवीस-चोवीस उमेदवार उभे केले. 
या दोन्ही पक्षांची बल्ले बल्ले झाली. तर शिवसेनेने घाटनांद्रा गट वगळता सात गट व हळदा, उंडनगाव, अंभई, आमठाना वगळता बारा गणात  एकोणवीस उमेदवार उभे करुण काँग्रेस भाजपासमोर आव्हान उभे केले. शिवसेनेच्या या उमेदवारीने निकालात तालुक्यात चित्र पलटू शकते? मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, एम आय एम, स्वाभिमानी, बसपा, संभाजी ब्रिगेड या पक्षांना तालुक्यातील काही गणात उमेदवार मिळाले नसल्याने या पक्षांची दैणा झाल्याचे चित्र  दिसत आहे.
 
91 अपक्ष 
या व्यतिरिक्त सोळा गणात 59 व आठ गणात 32 अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या अपक्षांची प्रमुख पक्षांच्या नेत्यांना मनधरणी करावी लागणार असून यात किती जण उमेदवारी अर्ज परत घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
 
राष्ट्रवादीची दैना 
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवना, उंडनगाव, अंधारी, भवन या चार गटात तर अजिंठा, शिवना, पानवडोद बू.,अंधारी,बोरगाव सारवानी,भवन या सहा गणात एकूण दहा उमेदवार दिले आहे. पूर्ण गण व गटात त्यांना उमेदवार उभे करता आले नाही.
 
इतर पक्षांना उमेदवार मिळाले नाही 
संभाजी ब्रिगेड ने पालोद,भराड़ी,अंधारी,भवन या चार गटात तर शिवना,पानवडोद बू.,घाटनांद्रा,भराड़ी, के-हाळा, अंधारी,निल्लोड या सात गणात असे एकूण अकरा उमेदवार दिले आहेत. एम.आय.एम. ने उंडनगाव,अंधारी या दोन गटात व अजिंठा, शिवना, घाटनांद्रा, पालोद या चार गणात असे सहा उमेदवार उभे केले आहे. बसपाने शिवना, उंडनगाव, घाटनांद्रा, भराड़ी, भवन या पाच गटात तर घाटनांद्रा,के-हाळा,भवन या तीन गणात असे आठ उमेदवार उभे केले. तर स्वाभिमानी पक्षाने देखील शिवना या एका गट व हळदा गणात उमेदवार उभे केले आहे.
 
चोवीस जागांसाठी एकूण 195 उमेदवार 
असे तालुक्यातील एकूण आठ गटात प्रमुख पक्षाचे 39 तर अपक्ष 32 असे एकूण 71 उमेदवार आहे.तर सोळा गणात प्रमुख पक्षाचे 65 व अपक्ष 59 असे 124 असे गट व गण मिळून चोवीस जागांसाठी एकूण 195 उमेदवार असून या पैकी किती जन निवडणूकिच्या आखाड्यात राहतात व किती उमेदवार उमेदवारी अर्ज परत घेतात हे उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजनार आहे.
 
एम आय एम ठरला फुसका बार 
मोठा गाजावाजा करुण तालुक्यातील संपूर्ण आठ गण व सोळा गणात उमेदवार कोणत्याही परिस्थित उभे करणार, असे छातीठोकपणे सांगणारे नेते उमेदवार न मिळाल्याने केवळ उंडनगाव,अंधारी या दोन गटात व अजिंठा,शिवना,घाटनांद्रा,पालोद या चार गणात असे सहा उमेदवार दिले. यामुळे तालुक्यात एमआयएमचा फुसका बार ठरल्याची बोलकी प्रतिक्रिया मतदार देत आहे.