बीड : देशभर प्रसिध्द असलेल्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील मयूर अभयारण्य अवैध वृक्षतोडीने उध्दवस्त होते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टींगमध्ये परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर अभयारण्यातील वृक्षांचा सरपण म्हणून वापर होत असल्याची बाब पुढे आली.अभयारण्यात चारा, पाणी नसल्यामुळे आधीच मोरांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. अवैध वृक्षतोडीने दुर्मिळ वृक्ष देखील संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अभयारण्यातील मोठमोठ्या वृक्षांवर सर्रास कुऱ्हाड चालविली जाते. परिणामी अभयारण्य ओस पडू लागले आहे.विशेष म्हणजे अभयारण्याचा कारभार औरंगाबाद येथून चालतो. स्थानिक पातळीवर वचक नाही. परिणामी वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळे रान आहे. (प्रतिनिधी)
अभयारण्यातील वृक्ष चक्क ‘धाब्या’वर !
By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST