शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बंद कंपनीत झाडांची कत्तल : एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:02 IST

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील बंद पडलेल्या कंपनीत शुक्रवारी (दि.९) बेकायदेशीररीत्या कटर मशीनच्या साहाय्याने नऊ झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल ...

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील बंद पडलेल्या कंपनीत शुक्रवारी (दि.९) बेकायदेशीररीत्या कटर मशीनच्या साहाय्याने नऊ झाडांची बेकायदेशीररीत्या कत्तल करण्यात आली. या वृक्षतोडीची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वाळूज एमआयडीसीतील भूखंड क्रमांक ए-१३ मधील एक कंपनी अनेक दिवसापासून बंद आहे. या कंपनीत काहीजण कटर मशीनच्या साहाय्याने झाडे तोडत असल्याचे कामगार व उद्योजकांना दिसल्याने त्यांनी याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांना दिली. त्यांनी सहायक अभियंता अरुण पवार, भवर यांना घटनास्थळाची पाहणी करण्यास सांगितले. यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता या कंपनीत पाहणी केली. जवळपास नऊ डेरेदार झाडे तोडल्याचे दिसून आले. घटनास्थळी झाडाच्या फांद्या, खोड दिसले. काही तोडलेली झाडे वाहनातून लांबविल्याचे आढळले. यावेळी कंपनीच्या नवीन बांधकामासाठी झाडांचा अडसर ठरत असल्याने कंपनी मालक सुमित पगारिया यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचे त्रिभुवन या बांधकाम ठेकेदाराने सांगितल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता पवार यांनी दिली.

झाडाची कत्तल करणारे पसार

प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच झाडे तोडणाऱ्यांनी कटर मशीन व झाडे तोडण्याची अवजारे सोबत घेऊन कंपनीतून पसार झाले. यानंतर सहायक अभियंता अरुण पवार यांनी कंपनी मालक पगारिया यांच्याशी संपर्क साधत झाडे तोडण्याची परवानगी असल्याची विचारणा केली. त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. या बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांना अहवाल पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्वच्छ व हरित उद्योगनगरी उपक्रमाला खो

एमआयडीसी प्रशासन व उद्योजक संघटनाच्या मदतीने गत पाच ते सहा वर्षांपासून वाळूज एमआयडीसीत ‘स्वच्छ व हरित एमआयडीसी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत उद्योगनगरीतील मोकळे भूखंड, रस्ते व कंपन्याच्या आवारात जवळपास एक लाख झाडे लावण्यात आलेली आहे. मात्र अनेकदा चोरी-छुपे ग्रीन बेल्ट व कंपन्यातील झाडे बेकायदेशिररीत्या तोडली जात असल्याने स्वच्छ व हरित उद्योगनगरी उपक्रमाला खो देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पर्यावरणप्रेमीत नाराजीचा सूर उमटत आहे.

फोटो ओळ

वाळूज एमआयडीसीतील ए सेक्टरमधील बंद पडलेल्या कंपनीत अशाप्रकारे झाडे कटर मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात वृक्षतोड झालेल्या कंपनीची पाहणी करतांना सहायक अभियंता अरुण पवार व त्यांचे सहकारी.