शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांवर सतरंजीवर उपचार

By admin | Updated: May 26, 2015 00:47 IST

वाशी : येथील ग्रामीण रूग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी ९० महिलांवर बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली

वाशी : येथील ग्रामीण रूग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी ९० महिलांवर बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या खाटांमुळे या महिलांना फरशीवर सतरंज्या टाकून उपचार करण्यात आले़ तर त्यांच्या लहान बालकांना चक्क झाडाच्या फांद्यांना झोळ्या बांधून झोपविण्याची वेळ रूग्णांसह नातेवाईकांवर आली़ आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महिला रूग्णांची मात्र, मोठी गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे़जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबीर येथील ग्रामीण रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते़ या शिबीरामध्ये तालुक्यातील ९० लाभार्थी महिलांना सहभाग नोंदवला होता. गेल्या अनेक महिन्यापासून बिनटाका शस्त्रक्रिया करण्यासाठी लाभार्थी महिला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात होत्या़ मात्र, आरोग्य विभागाने शस्त्रक्रिया करण्यास दिरंगाई केली होती. दिरंगाई झाल्यामुळे सोमवारी आयोजित शिबिरात सर्वच ९० महिला सहभागी झाल्या़ या शस्त्रक्रियेसाठी रविवारी रात्रीपासून या महिलांसह नातेवाईकांची रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती़ प्रयोगशाळेतील तपासण्या करून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल देण्यात आला होता़ त्यानंतर बीड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. राहूल यंदे यांनी सोमवारी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. शस्त्रक्रियेनंतर मात्र, ग्रामीण रूग्णालयात खाटांची संख्या अपुरी असल्याने या महिलांना चक्क फरशीवर सतरंजी टाकून उपचार करण्यात आले़ झाडांना झोळ्या बांधून बालकांना झोपविण्यात आले़ या गैरसोयीमुळे महिलांसह नातेवाईकांनी मात्र, तीव्र संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)