शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

सात हजार रुग्णांवर दोन वर्षात उपचार

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

लातूर : राज्यात लागू झाल्यापासून दोन वर्षात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून लातूर जिल्ह्यातील सात हजार आठ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत

लातूर : राज्यात लागू झाल्यापासून दोन वर्षात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून लातूर जिल्ह्यातील सात हजार आठ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांवरील उपचारापोटी विविध रुग्णालयांना राज्य शासनाच्या वतीने तब्बल १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. किडनी, मेंदू, हृदय आणि अपघातातील जखमींसह तब्बल ९७१ आजारांवर रुग्णांना उपचार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २१ नोव्हेंबर २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना लागू झाल्यानंतर ती योजना जिल्ह्यातील रुग्णांसाठी खरोखर ‘जीवनदायी’ ठरल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात आहे. मराठवाड्यात औरंगाबादनंतर लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ मिळविला आहे. दोन वर्षात जिल्ह्यातील सात हजार १३१ रुग्णांनी उपचारसाठी पूर्वपरवानगी मागितली होती. त्यापैकी ७००८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. उपचार घेणाऱ्यामध्ये ३०१९ स्त्री तर ३९८९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये ७४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार झाले आहेत तर ५०४० रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. उरलेल्या रुग्णांवर जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. नऊ खासगी रुग्णालयात उपचार लातूर जिल्ह्यातील या नऊ रुग्णालयांचा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश आहे. यामध्ये अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती शाहू अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल, देशपांडे हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर कॅन्सर हॉस्पिटल, लाईफकेअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेेंटर उदगीर, ममता हॉस्पिटल, एमआयटी माईर्स वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय, चांडक हॉस्पिटल मुरुड या रुग्णांलयाचा समावेश आहे.