शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स कंपनीला ठोठावला दंड

By admin | Updated: September 14, 2014 23:38 IST

परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे.

परभणी : इंटरनेटद्वारे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले असतानाही प्रवास करु दिला नसल्याने ट्रव्हलयारी डॉट कॉम व श्रीफल ट्रॅव्हल्स यांना ग्राहक न्यायमंचाने दंड ठोठावला आहे.या प्रकरणाची माहिती अ‍ॅड.अरुण खापरे यांनी दिली. त्यानुसार डॉ.श्रीनिवास कारले यांनी १७ फेब्रुवारी २०१३ रोजी परभणी ते नागपूर प्रवासासाठी ट्रव्हलयारी डॉट कॉमवरुन २३ व २४ फेब्रुवारी २०१३ चे नागपूर ते परभणी परतीच्या प्रवासाचे आरक्षण केले होते. या आरक्षणाची स्लीप घेऊन ते प्रवासासाठी निघाले असता त्यांना व त्यांच्या मित्रांना श्रीफल ट्रॅव्हल्स यांनी २३ फेब्रुवारी रोजी प्रवास करु दिला. परंतु, २४ फेब्रुवारी रोजी परतीच्या प्रवासादरम्यान श्रीफल ट्रॅव्हल्स यांनी डॉ.कारले व त्यांच्या मित्रांना नागपूर येथून संजय ट्रॅव्हल्स येथून आरक्षित सीटवर प्रवास करु दिला नाही. ही सीट आमच्या कार्यालयाकडून आरक्षित झालेली नाही, असे सांगून बसलेल्या जागेवरुन खाली उतरविले. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. नागपूर ते नांदेड असा उलटा प्रवास करुन बिना एसी त्रासदायक प्रवास करावा लागला. त्यामुळे याविरुद्ध डॉ.कारले यांनी जिल्हा ग्राहकमंचात ट्रॅव्हलयारी व श्रीफल ट्रॅव्हल्स यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ग्राहकमंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून त्रुटीची सेवा दिल्याबद्दल २ हजार रुपये दंड व आरक्षित केलेल्या तिकिटांची रक्कम १८०० रुपये असा दंड ठोठावला. ग्राहक मंचचे अध्यक्ष निटूरकर व सदस्या अनिता ओस्तवाल यांनी हा आदेश दिला. अर्जदारातर्फे अ‍ॅड.अरुण खापरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)