शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विनातिकीट प्रवास पडला कैकपट महागात

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील वाढत्या विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिकीट तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर गुरुवारी अशा प्रकारे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे गुरुवारी अनेकांना विनातिकिटाचा प्रवास चांगलाच महाग पडला.रेल्वेस्थानकावर दिवसभर ही मोहीम राबविली गेली. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज, २० तिकीट तपासणीस आणि आरपीएफ जवानांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध रेल्वेंमध्ये आणि स्थानकावर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली. यात २२० प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून जवळपास ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांकडून विविध रेल्वेस्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तिकीट काढून प्रवास करावाप्रवाशांनी रेल्वेच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे. यासाठी विनातिकीट प्रवास करणे टाळले पाहिजे. प्रत्येकाने तिकीट काढूनच रेल्वे प्रवास केला पाहिजे, असे दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्लस हेरेंज म्हणाले.प्रवासी संख्या कमीरेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण हे अधिक असल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने वेळोवेळी तपासणी मोहीम हाती घेण्यात येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईदरम्यानही विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून येण्याचे प्रमाण सध्या कमी आहे.