शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

झाल्ट्यात दरोडा

By admin | Updated: March 14, 2016 00:57 IST

औरंगाबाद : दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला.

औरंगाबाद : कुटुंबीय गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी दोन घरांवर हल्ला चढवला. कुलूप तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत झाल्टा येथे रविवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास धुमाकूळ घातला. यात चौघे जखमी असून दोन जण गंभीर आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूआहेत. रेखा दीपक शिंदे, वाळोबा दळवी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, दीपक शेषराव शिंदे (रा. झाल्टा) यांच्या बंगल्यात तीन दरोडेखोरांनी पहाटे ३ च्या सुमारास दरोडा घातला. शिंदे कुटुंबीय झोपेत असतानाच घराचा कडीकोंडा तोडून ते बंगल्यात घुसले. दीपक यांच्या पत्नी रेखा यांच्या खोलीत शिरून त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांचे वडील व अन्य नातेवाईकांना धमकावून दरोडेखोरांनी कपाटे उचकटली. आतून सोन्याची एकदाणी, अंगठ्या पोत, मोबाईल, अशा वस्तू लंपास केल्या. शिंदे यांच्या घरी धुमाकूळ घातल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गजानन नंदू सुरासे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घरावर चालून गेलेल्या दरोडेखोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथेही दरोडेखोरांनी कुटुंबियांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटला. चोरीचा प्रकार सुरू असतानाच सागर सुरासे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांसोबत झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. दरोड्याचा हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी एकाला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु दरोडेखोरांनी बाळू सुरासेंच्या डोक्यात वार केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.ही घटना माहिती झाल्यावर पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, महेश आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.४ श्वानपथकाने जवळच असलेल्या टाकळी शिवारातील पारधी वस्तीपर्यंत माग काढला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र त्यातून काहीही पुढे आले नाही.पथके रवानाया घटनेनंतर पोलिसांची दोन पथके जालना आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू केली असून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक कसून तपास करीत आहेत. बचत गटाचे पैसे गेलेनंदू सुरासे यांच्या घरात त्यांना बचत गटाचे मिळालेले पैसे ठेवण्यात आले होते. ते दरोडेखोरांनी लुटले. तसेच दीपक शिंदे याच्या घरात भाचीच्या लग्नासाठी काही दागिने व रक्कम होती. दरोडेखोरांनी दागिने लुटले; सुदैवाने रक्कम वाचली. घटना घडल्यावर नंदू सुरासे यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रिया थोरात करीत आहेत.