जालना : येथील पाणीवेस ते कादराबाद भागात एकतर्फी वाहतूक आहे. पाणीवेसमधून कादराबाद भागाकडे जाता येत नसताना नियमबाह्य आॅटोरिक्षा नेण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीने पोलीस शिपायांशी वाद घालून त्यांना दमदाटी केली. विशेष बाब म्हणजे या आॅटोरिक्षावर क्रमांकही नव्हता. वाहतूक शाखेचे पोलिस नाईक हरिकिशन बाबूराव दळवी हे पाणीवेस भागात कर्तव्य बजावत असताना शिंदे नामक रिक्षाचालक वाहतुकीचे नियम मोडीत काढून आपली आॅटोरिक्षा प्रवेश निषेध असलेल्या भागातून चालविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला दळवी यांनी अटकाव केला. त्यामुळे वाद घालून आॅटोरिक्षा पुढे नेण्याचा चालकाने प्रयत्न केला. मात्र क्रमांक नसल्याने कागदपत्रांची मागणी केली. त्यालाही विरोध केला. अरेरावी करीत दमदाटी करून आॅटोचालकाने पळ काढला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदारांनी दिली. (प्रतिनिधी)
वाहतूक शाखेच्या पोलिसाला दमदाटी
By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST