बिलोली : तालुक्यातील गंजगाव स्थित शासकीय वाळू घाटांवर नियमबाह्य कार्यवाही केल्याचा ठपका औरंगाबाद खंडपीठाने ठेवल्यानंतर अडचणीत आलेल्या बिलोलीच्या तहसीलदारांची अवघ्या चार महिन्यातच बदली करण्यात आली आहे़ दरम्यान आता प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी भवनाजी आगे पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश आले आहेत़तालुक्यात यावर्षी तीनच शासकीय वाळू घाटांचा लिलाव झाला़ डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर सगरोळी व येसगी वाळू घाट बंद झाले़ दोन्ही घाटांना २२ कोटी दंड आकारण्यात आला़ पण तत्पूर्वी जिल्हा समितीने दोन्ही वाळू घाटांचा सर्व्हे करून अहवाल दिला़ त्यानुसार कार्यवाही झाली़ पण याउलट गंजगाव प्रकरणाला वेगळेच वळण आले़ मुदतपूर्व तहसीलदार राजकुमार माने यांनी गंजगाव वाळू घाटाला भेट दिली़ कोणतीही सूचना अथवा अहवाल न देताच सदरील ठेकेदाराने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली़ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बिलोली तहसीलदारांवर ताशेरे ओढले़ परिणामी जिल्हा प्रशासनही अडचणीत आले़ वाळूघाट पूर्ववत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले़ न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर माने यांना महिनाभरापूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले़लोकसभा निवडणुकीच्या काळात आलेल्या तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे़ महिनाभरापासून नवनाथ वगवाड यांच्याकडे पदभार आहे़ आता पालम येथून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी भवनाजी आगे येणार आहेत़ तहसीलदार पदावर जिल्हाधिकारी श्रेणीचा अधिकारी पहिल्यांदाच येत आहेत.(वार्ताहर)
गंजगाव वाळू घाट प्रकरणी बिलोलीच्या तहसीलदारांची बदली
By admin | Updated: August 20, 2014 00:16 IST