शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात ...

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुन्हा अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात आला आहे. याबाबत सोमवार, २८ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होईल. मंगळवारपासून जिल्ह्यात आणि शहरात शासनाच्या आदेशानुसार तिसऱ्या स्तरातील नियम लागू होती, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. मंगळवारपासून सर्व आस्थापनांना दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या जातील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल. इतर दिवशी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता संचार व जमावबंदी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शनिवार, रविवार दिवसभर संचारबंदी

दर आठवड्यातील शनिवार, रविवार पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असेल. सोमवार ते शुक्रवार या दिवसांतच सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यापारी बाजारपेठा खुल्या राहतील. उद्योगांना यातून वगळण्यात येणार आहे.

जळगांवसह सर्व जिल्ह्यांच्या सीमांवर तपासणी

डेल्टा प्लसची लागण झालेला रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळला असून, जळगांवकडून जिल्ह्याकडे येणाऱ्या सर्व सीमांवर वाहनांच्या कडक तपासणीच्या अनुषंगाने अ‍ँटिजन, आरटीपीसीआर करण्यात येत आहे, तसेच इतर जिल्ह्यांतून औरंगाबादकडे येणाऱ्या आंतरजिल्हा सीमांवरही वाहन, प्रवाशांची तपासणीचा निर्णय सोमवारी होणार आहे.

चौकट...

व्यापाऱ्यांनी शासनाला बोलावे

व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे, परंतु जिल्हा तिसऱ्या स्तरात आणून सर्व निर्बंध लागू करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शासनाला भेटून निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी करावी, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

चौकट...

सिनेमागृह, नाट्यगृह सुरू ठेवण्याचा विचार

२१ दिवसांपूवी शहर पहिल्या टप्प्यात आले होते. त्यामुळे सर्व निर्बंध हटविल्याने सिनेमागृह, नाट्यगृहे, मॉल्स सुरू झाले होते. आता पुन्हा निर्बंध येणार असल्यामुळे सोमवारी प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू ठेवण्याबाबत विचार करण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तविली, तसेच मॉल्सबाबतही सर्वानुमते निर्णय होईल. हॉटेल्समध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंग सुविधा ५० टक्के क्षमतेत असणार आहे. त्यानंतर, पार्सल सुविधेला परवानगी असणार आहे. शनिवार, रविवार हॉटेल्स पूर्णत: बंद असतील.