चंदनझिरा : शॉर्टसर्किट झाल्याने सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. ही घटना चंदनझिरा टी पॉइंटवर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. ट्रक (एम.एच. १२ एफसी ३४९९) चंदनझिरा पोलीस टी पॉईटवर उभा करण्यात आला होता. ट्रकमध्ये बसविण्यात आलेल्या बॅटरीला जोडलेल्या तारांमध्ये घर्षण झाले. या घर्षणामुळे ट्रकच्या कॅबीनने पेटला घेतला. वरील ताडपत्रीने तात्काळ पेट घेतला. आग क्षणार्धात इतरत्र पसरल्याने ट्रकची कॅबीन संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने ट्रकमध्ये कोणी नसल्याने जिवीत हानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच परिसरातील सतर्क नागरिकांनी तातडीने पाण्याचा टँकर आणून आग विझविली. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
शॉर्टसर्किटमुुळे ट्रकला आग
By admin | Updated: April 17, 2017 23:38 IST