शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक झाले चकाचक

By admin | Updated: June 19, 2014 00:51 IST

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेले औरंगाबादचे रेल्वेस्थानक बुधवारी गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसले.

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेले औरंगाबादचे रेल्वेस्थानक बुधवारी गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत अधिक चकचकीत दिसले. नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांचा दौरा असल्यामुळे स्थानकाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले गेले. स्थानक आणि परिसरात ते पाहणी करीत असतानाही स्वच्छतेचे काम सुरूच होते. रेल्वेस्थानक आणि परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शर्मा यांचा हा दौरा होता. त्यांनी स्वच्छतेच्या कामांची प्राधान्याने पाहणी करीत अस्वच्छतेबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. १० वाजता शर्मा यांनी स्वच्छता आणि सोयी-सुविधांची पाहणी सुरू केली. जवळपास तीन तास ते पाहणी करीत होते. शर्मा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कॅन्टीन, वेटिंग रूम, स्वच्छतागृह, मालधक्का, पार्किंग, लिफ्ट आदींची पाहणी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. मालधक्क्यावर ट्रक उभे करण्यासाठी पुरेशी जागा आहे का, याविषयी माहिती घेतली. प्लॅटफॉर्मवर तुटलेल्या फरशा, स्टाईल्स आदी बाबींविषयी त्यांनी सूचना केल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील बंद असलेले स्वच्छतागृह सुरू करण्याचीही सूचना त्यांनी केली. यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक अशोक निकम, सहायक मंडल अभियंता डी. चंद्रमोहन आदी अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आढावाइंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम केले जाणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधांबरोबर पर्यटकांना केंद्रबिंदू ठेवून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वेस्थानकाची उभारणी केली जाणार आहे. १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या कामाच्या नियोजनाविषयी शर्मा यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.मागणीनुसार प्रस्तावआगामी अर्थसंकल्पात जनतेच्या मागणीनुसार प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत लवकरच सीसीटीव्ही क ॅमेरे बसविण्यात येणार असून, ते काम प्रगतिपथावर आहे. घोषित करण्यात आलेली औरंगाबाद- रेनीगुंटा गाडी सुरू करण्याचा मार्ग आगामी अर्थसंकल्पानंतर मोकळा होईल, असे पी.सी. शर्मा यांनी सांगितले.पाहणीदरम्यानही स्वच्छताअधिकाऱ्यांकडून स्थानकाची पाहणी सुरू असतानाही प्लॅटफॉर्म, रेल्वे रूळ, नाली यांची सफाई सुरू होती. नेहमीपेक्षा आज जास्त स्वच्छता होत असल्याने रेल्वेचे अधिकारी आले आहेत का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.यावेळी वेटिंग रूममधील महिला प्रसाधनगृह स्वच्छ आहे की नाही याची पाहणी त्यांनी केली. स्वच्छतेचे आवाहनअस्वच्छतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी स्थानक आणि रेल्वेत स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन पी.सी. शर्मा यांनी केले.