शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

्र्रपोलिसांच्या छापासत्राने वसमतमध्ये हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:56 IST

शहर पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधात छापा सत्र सुरूच ठेवल्याने अवैध व्यवसायिक पार हादरले आहेत. शहरातील अवैध दारु, जुगार, मटका, धान्य तस्करी, रॉकेल तस्करी, गुटखा विरोधात एकापाठोपाठ एक सलग कारवाया होत असल्याने वसमत शहर अवैध व्यवसायमुक्त करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अवतरलेली दिसत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सामान्य नागरिकांनाही हिम्मत आल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहर पोलिसांच्या अवैध व्यवसायाविरोधात छापा सत्र सुरूच ठेवल्याने अवैध व्यवसायिक पार हादरले आहेत. शहरातील अवैध दारु, जुगार, मटका, धान्य तस्करी, रॉकेल तस्करी, गुटखा विरोधात एकापाठोपाठ एक सलग कारवाया होत असल्याने वसमत शहर अवैध व्यवसायमुक्त करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात अवतरलेली दिसत आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने सामान्य नागरिकांनाही हिम्मत आल्याचे चित्र आहे.वसमत शहर पोलीस ठाण्याचा प्रभार तीन महिन्यांपूर्वी उदयसिंह चंदेल यांनी स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत वसमत पोलिस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय व गुंडगिरीला थारा देणार नाही, अशी घोषणा केली होती. पदभार स्वीकारताना बहुतेक वेळी अशाच घोषणा होतात मात्र त्यानंतर चित्र उलटे असते. असा आजवरचा अनुभव होता. मात्र या वेळेचे चित्रच उलट दिसत आहे.पोलीस निरीक्षक चंदेल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठाण्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्यात हिम्मत वाढवण्याचे काम केले. त्याचा परिणाम असा झाला की, आज पोलीस काँस्टेबलचाही आत्मविश्वास वाढून कामगिरी सुधारली आहे. वसमत शहरात अवैध दारु विक्री ही सर्वात मोठी समस्या होती. राष्टÑीय महामार्गावरही खानावळीच्या नावाखाली ‘पिनावळी’ सुरू होत्या अवैध दारु विक्रीविरोधात सर्वाधीक गुन्हे दाखल झाले. पार्सल दारु तर वसमत शहरातून जिल्हाभरात नांदेड जिल्ह्यातही जात असते. पार्सल पाठवणारांच्या टोळ्याच आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली. दुचाकीसह दारुचा साठा जप्त करण्याचा सपाटा लागल्याने पार्सलदारु वसमतमधून जाणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे दारु विक्रेते व पार्सल टोळ्या हादरल्या आहेत.धान्य तस्करीसाठी वसमत तालुका मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. वसमत शहरात रेशनच्या धान्याची खरेदी करून माळवटा, कुरूंदा मार्गे नांदेड, हैदराबादकडे राशन पाठवणाºया अनेक टोळ्या शहर व तालुक्यात आहेत.वसमत शहरात धान्य तस्करीवर झालेल्या कारवायांनी धान्य तस्करही हादरले आहेत.