जालना : मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाना घालणाऱ्या ‘त्या’ वाहतूक पोलिसाची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालणाऱ्या जिल्हा वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी संजय घोरपडे याच्या प्रतापाचे लोकमतने सचित्रवृत्त प्रकाशित करून उघडकीस आणल्याने एकच खळबळ उडाली. या संदर्भात प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी धिंगाना घालणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खातेनिहाय चौकशी केली जाईल. आपणच जनतेला नैतिकता शिकवायची आणि असे वागायचे असा प्रकार आपण खपवून घेणार नाही. खातेनिहाय चौकशी करून कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ठाण्यात तक्रार नाहीज्या पेट्रोलपंपावर त्या कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत दगडफेक करून तोडफोड केली. त्या पंप मालकाने किंवा चालकाने पोलिस ठाण्यात तक्रारच नोंदविली नसल्याचे सदर बाजार पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष पाटील म्हणाले की, या संदर्भात अद्याप ठाण्यात कोणतीही तक्रार आलेली नसल्याने गुन्हा दाखल नाही. मात्र या प्रकाराबाबत आपण अहवाल तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे पाठविणार असल्याचे पाटील म्हणाले.
त्या वाहतूक पोलिसाची खातेनिहाय चौकशी करणार- राहूल माकणीकर
By admin | Updated: November 16, 2015 00:36 IST