शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीला शिस्त लागता लागेना...!

By admin | Updated: June 29, 2014 01:05 IST

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील तिरंगा चौक, महावीर चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, एफडीसी चौक, आंबेडकर चौक, रांजणगाव फाटा, सिमेन्स चौक, कामगार चौक, बजाजगेट, गरवारेगेट आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावून सर्रास राँग साईडने ये-जा करतात. त्यामुळे या चौकात छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो.औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात उद्योजक, कामगार, व्यावसायिक तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळविक्रेते, हॉटेल, टपरीचालक, पाणी-पुरीवाले व अवैध वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळी आदी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोरे चौक, महाराणा प्रताप चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी थांबत नसल्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. दुचाकीस्वार तसेच वाहनचालक राँग साईड तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे अपघात वाढले आहेत. सकाळी कंपनीत जाताना उद्योजक, कामगारांना व शहरातून कामगारांची ने-आण करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कामगार कंपनीत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे शिफ्ट विलंबाने सुरू होते व त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. सायंकाळी घरी परतणारे उद्योजक, कामगार व वाहनचालकांनाही हाच वाहतूक कोंडीचा त्रास होतो. पंढरपुरातील तिरंगा चौक व कामगार चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या दोन्ही चौकात उड्डाणपुलाची गरज आहे. लवकरच मासिआ संघटनेतर्फे जिल्हा उद्योग मित्रांच्या बैठकीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जाणार आहे.- राहुल मोगले, उद्योजकवाहतूक शाखेचे दुर्लक्षवाळूज औद्योगिक परिसरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे वाहतूक शाखेचे लक्ष नाही. त्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. हा प्रश्न वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोडवावा.- पी. के. गायकवाड, उद्योजक