शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘चक्का जाम’मुळे वाहतूक ठप्प

By admin | Updated: January 31, 2017 23:32 IST

लातूर :मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लातूर शहरातील पाच नंबर चौक, गरुड चौक, रेणापूर नाका, बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक या प्रमुख पाच चौकांतून शहरात व शहराबाहेर जाणारी वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे ठप्प झाली होती. रुग्णवाहिकांना मात्र कार्यकर्त्यांनी स्वत:हून रस्ता मोकळा करून दिला. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत आंदोलन चालू होते. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस बसस्थानकातून सोडण्यात आली नाही.रस्त्यावर दुचाकी आडव्या लावून रस्ते ब्लॉक केले होते. लातूर शहरातून मुरुड, कळंब, अंबाजोगाई, नांदेड, औसा या मुख्य रस्त्यांकडे जाणारे सर्व रस्ते चक्का जाम आंदोलनामुळे ब्लॉक करण्यात आले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. रिंग रोडवर अवजड वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राजीव गांधी चौक ते पाच नंबर चौक या रिंग रोडवर अवजड वाहनांच्या रांगा होत्या. तिकडे नांदेड रोडवरही गरुड चौकाच्या पुढे अवजड वाहनांना दुपारी ३ वाजेपर्यंत थांबावे लागले. शहरातील पाच नंबर चौक, गरुड चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, रेणापूर नाका चौकात कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)