शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतूकदारांची धरपकड

By admin | Updated: July 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दिवसभर आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. यामध्ये पथकांनी अनेक भरधाव वाहनांचा पाठलाग करून कारवाई केली. त्यामुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले. कारवाईदरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे अशा वाहनांमधून प्रवास करणे प्रवाशांनाही महागात पडले.सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून गिरिजा नदीपात्रात कोसळल्याची घटना २० जुलै रोजी पाथ्रीजवळ घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात २१ रोजी पार पडलेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार सोमवारपासून या मोहिमेला सुरुवात झाली. आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई करून अवैध वाहतूकदारांची धरपकड केली. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. यामध्ये जीप, ट्रॅक्ससह मालवाहू वाहनांचा समावेश होता. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईची कल्पना असल्याने अनेकांनी वाहन रस्त्यावर आणले नाही. त्यामुळे या कारवाईमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात टाक णाऱ्या अवैध वाहतूकदारांवर चाप बसत आहे.