शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शॉप अ‍ॅक्टमधून व्यापा-यांना संपूर्ण मुक्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:31 IST

स्वातंत्र्यापासून अस्तित्वात असलेला महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायदा १९४८ (शॉप अ‍ॅक्ट) रद्द झाला असून, त्याऐवजी संशोधित कायदा लागू होणार आहे. यामुळे ९० टक्के व्यापा-यांना शॉप अ‍ॅक्टमधून मुक्ती मिळणार आहे; पण याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण व्यापाºयांना यातून मुक्ती मिळेल. जिल्ह्यातील ३ लाख व्यावसायिकांपैकी ३० हजार व्यावसायिकांना ‘संशोधित शॉप अ‍ॅक्ट’ लागूच राहील.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वातंत्र्यापासून अस्तित्वात असलेला महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायदा १९४८ (शॉप अ‍ॅक्ट) रद्द झाला असून, त्याऐवजी संशोधित कायदा लागू होणार आहे. यामुळे ९० टक्के व्यापा-यांना शॉप अ‍ॅक्टमधून मुक्ती मिळणार आहे; पण याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण व्यापा-यांना यातून मुक्ती मिळेल. जिल्ह्यातील ३ लाख व्यावसायिकांपैकी ३० हजार व्यावसायिकांना ‘संशोधित शॉप अ‍ॅक्ट’ लागूच राहील.कोणताही व्यवसाय सुरू करायचा असला तर त्याची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयात ‘शॉप अ‍ॅक्ट’नुसार करावी लागते. या शॉप अ‍ॅक्टच्या परवान्यावरच त्या व्यावसायिकाला विविध सरकारी परवाने मिळत व बँकांमधून कर्जपुरवठाही केला जात असे; मात्र मुळातच शॉप अ‍ॅक्टच्या आधारे बँकांनी कर्ज पुरवठा करण्याचा काहीच संबंध नव्हता. कारण, शॉप अ‍ॅक्ट ही काही व्यवसाय सुरू करण्यासाठीची परवानगी नव्हती. फक्त नव्याने सुरू झालेल्या व्यवसायात किती कर्मचारी, कामगार काम करतात याची माहिती कामगार उपायुक्त कार्यालयात ठेवली जात होती. त्यानुसार शॉप अ‍ॅक्ट इन्स्पेक्टर दुकानांची तपासणी करीत असत. व्यवसाय करणे सहज, सुलभ व्हावे, कमीत कमी परवानग्या व कर असावेत, ही सरकारची भूमिका आहे, तसेच कालबाह्य शॉप अ‍ॅक्ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिकांच्या संघटनांकडून केली जात होती. अखेर १९ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संशोधित शॉप अ‍ॅण्ड इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट (गुमास्ता परवाना)ला मंजुरी मिळाली. याअंतर्गत ज्या व्यावसायिकांकडे १० पेक्षा कमी कामगार असतील त्यांना आता यापुढे गुमास्ता परवाना घेण्याची गरज नाही. फक्त त्यांना आॅनलाईन फॉर्म भरून कामगार उपायुक्तालयाला सूचना द्यावी लागणार आहे; मात्र ज्यांच्याकडे १० पेक्षा अधिक कामगार आहेत अशा व्यावसायिकांना मात्र नवीन संशोधित कायदा लागू राहणार आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात आजघडीला जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ६५ दुकाने,आस्थापना आहेत. नवीन संशोधित कायदा लागू झाल्यावर यातील ९० टक्के व्यावसायिकांना यापुढे शॉप अ‍ॅक्टनुसार परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार नाही. ३० हजार व्यापारी ज्यांच्याकडे १० पेक्षा अधिक कामगार आहेत त्यांनाचनवीन संशोधित कायदा लागू राहणार आहे.शॉप अ‍ॅक्ट ज्यास गुमास्ता परवाना असेही म्हणतात. स्वातंत्र्यापासून हा कायदा अस्तित्वात होता; पण आता शासनाने जुना कायदा रद्द करून नवीन कायद्याची नवीन वर्षात अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे; पण प्रत्यक्षात अजून आमच्या कार्यालयाला नवीन परिपत्रक प्राप्त झाले नाही.-शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक्तशॉप अ‍ॅक्ट कायदाच रद्द होणे अपेक्षितकालबाह्य झालेला शॉप अ‍ॅक्ट कायदा संपूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशी व्यापारी वर्गाची मागणी होती; पण सरकारने तसे न करता व्यापाºयांमध्ये दोन गट पाडले आहेत. ज्यांच्याकडे १० च्या खाली कामगार आहेत त्यांना शॉप अ‍ॅक्ट लागू राहणार नाही, हा निर्णय चांगला आहे; पण ज्यांच्याकडे १० पेक्षा अधिक कामगार आहेत त्यांना नवीन संशोधित शॉप अ‍ॅक्ट लागू राहील, तसेच शॉप अ‍ॅक्टमुळे शासनाच्या महसुलातही काही फरक पडत नाही. आस्थापनेत कामगारांच्या संख्येची अट न ठेवता संपूर्णपणे शॉप अ‍ॅक्ट रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.-प्रफुल मालानी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स