शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कॅरिबॅगच्या कारवाईस व्यापाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या घनकचरा विभागाकडून दररोज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे पथक अंगुरीबाग येथे पोहोचल्यावर परिसरातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला. २०० पेक्षा अधिक नागरिक-व्यापाऱ्यांच्या जमावाने मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मनपातर्फे रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.शासनाने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. या पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. शहरातील विविध नाल्यांमध्येही कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी शहरात कॅरिबॅगमुक्तीसाठी जोरदार मोहीम सुरू केली. शहरात कॅरिबॅग विकणाऱ्या आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मागील सहा ते सात महिन्यांपासून मनपाच्या घनकचरा विभागातर्फे ही कारवाई सुरू आहे.मंगळवारी सायंकाळी मनपाचे पथक अंगुरीबाग येथील कॅरिबॅग विकणाऱ्या दुकानदारांची झाडाझडती सुरू केली. यावेळी अचानक व्यापारी एकत्र झाले. त्यांनी मनपाच्या पथकाला पिटाळून लावले. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मनपाने कारवाईला तूर्त पूर्णविराम दिला. नंतर घनकचरा विभागप्रमुख शिवाजी झनझन यांनी सिटीचौक ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केली.