शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अंबडमध्ये तूर विक्रीसाठी ट्रॅक्टर, बैलगाडींच्या रांगा

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

अंबड : तुरीची आवक अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे

अंबड : तुरीची आवक अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. बाजार समिती आवारात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची जवळपास अडीचशे ट्रॅक्टर आदी वाहनांची गर्दी झाल्याने व केवळ एकच तूर खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांना कित्येक दिवसांचा मुक्काम करावा लागणार असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. नाफेडच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. नाफेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या तुर खरेदी केंद्रामध्ये प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपयांचा भाव मिळत असल्याने नाफेडच्या या विविध खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मागील आठवडयात विविध कारणांनी जालना, गेवराई, पैठण, तीर्थपुरी आदी ठिकाणचे तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरु असलेल्या तूर खरेदी केंद्रावर तोबा गर्दी केली. दोन दिवसांत बाजार समिती आवारात तूर आणलेल्या जवळपास अडीचशे ट्रॅक्टर आदी वाहनांनी गर्दी केल्याने बाजार समिती परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. तूर नोंदणी व मोजणी करण्यासाठी एकच केंद्र असल्याने शेतकऱ्यांना जवळपास आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन अंबड बाजार समितीने ६ मार्चपर्यंत तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. आतापर्यंत या केंद्रावर २ हजार २०० क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. समिती आवारात गेवराई, पैठण, घनसावंगी, तिर्थपुरी, पाचोड, कुंभार पिंपळगाव आदी ठिकाणच्या मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करत असल्याचे सचिव पी.एस.सोळुंके यांनी सांगितले.