शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विलंब शोधण्यासाठी आता ‘ट्रॅकरशीट’

By admin | Updated: November 15, 2014 23:55 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मजुरांची मजुरी ठराविक कालावधीत वितरित करणे बंधनकारक आहे़

प्रसाद आर्वीकर,  परभणीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मजुरांची मजुरी ठराविक कालावधीत वितरित करणे बंधनकारक आहे़ मजुरी वाटपात होणाऱ्या विलंबावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने आता ‘ट्रॅकरशीट’ काढले असून, या ट्रॅकरशीटच्या माध्यमातून नेमका विलंब कोठे होतो हे शोधण्यास मदत मिळणार आहे़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते़ काम दिल्यानंतर मजुरांची मजुरी ठराविक कालावधीमध्ये त्यांना मिळणे बंधनकारक आहे़ जिल्ह्यात या योजनेंतर्गत सर्व मजुरांना आॅनलाईन मजुरी वाटप होते़ परंतु, असे असतानाही बऱ्याच वेळा मजुरी वाटप करण्यास विलंब लागतो़ मजुरी वितरित करण्याचे तीन-चार टप्पे आहेत़ प्रत्येक टप्प्यावर संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत आॅनलाईन फाईल्स तयार होतात़ त्यामुळे मजुरी वितरित करताना नेमका विलंब कुठे झाला हे लक्षात येणे अवघड जात होते व शासनाला नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागत होती़ राज्यातील सर्वच जिल्ह्यात ही समस्या होती़ स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रयोगही या संदर्भात झाले आहेत़ परंतु, आता मात्र शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून ट्रॅकरशीट तयार केली आहे़ त्यामुळे नेमका विलंब कुठे झाला याचे स्पष्टीकरण मिळणार आहे़ तसेच मजुरांच्या मजुरी वितरणातही आणखी पारदर्शकता येणार आहे़