शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
3
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
4
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
5
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
6
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
7
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
8
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
9
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
10
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
11
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
12
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
13
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
14
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
15
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
17
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
18
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
19
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा

गुन्ह्यापूर्वी जेवणावर ताव; मोबाईल ठेवले ‘स्वीचआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 22:59 IST

बीड रवींद्र मनोहर मदने या तरुणास मारेकऱ्यांनी अतिशय थंड डोक्याने संपविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

संजय तिपाले  बीडरवींद्र मनोहर मदने या तरुणास मारेकऱ्यांनी अतिशय थंड डोक्याने संपविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. हत्येपूर्वी रवींद्रसोबत आष्टीत त्यांनी ढाब्यावर जेवण केले होते. लोकेशन टाळण्यासाठी तिघांनीही स्वत:चे मोबाईल बंद ठेवले. रवींद्रचे प्रेत ईमामपूर रोडवर पुरल्यानंतर या सर्वांनी ‘जीव गेला तरी खरं कधीच सांगायचं नाही’ अशी शपथ घेतली होती. नववी, दहावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या या त्रिकुटांनी केलेल्या ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ने पोलीसही हादरून गेले.विशीतील रवींद्रच्या खुनाचा आरोप असलेला दत्तात्रय अशोक जामकर व इतर दोन अल्पवयीन हे सर्व मैंदा (ता.बीड) येथील रहिवासी आहेत. दत्तात्रय बीए प्रथम वर्षात तर उर्वरित दोघे अनुक्रमे नववी व दहावीत शिकतात. तिघेही सर्वसाधारण कुटुंबातील असून रवींद्रचे मित्र आहेत. दीड महिन्यापूर्वी जामकरने रवींद्रच्या वडवणी येथील शॉपीतून मोबाईल खरेदी केला होता. मात्र, पैशाच्या देवाण- घेवाणीतून त्यांच्यात वितुष्ट आले. त्यावेळी रवींद्रने जामकरला चापट मारली होती. त्याचा बदला घेण्यासाठी जामकरने त्याच्या खुनाचा कट रचला. अहमदनगरला लग्नाला जाण्याचे निमित्त करुन ९ जानेवारी रोजी रवींद्रची कार क्र. (एमएच २० बीसी- ३२८०) भाड्याने घेतल्यानंतर या तिघांनीही बीड सोडताच आपले मोबाईल स्वीच आॅफ केले. जामखेडजवळ त्यांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर आष्टीनजीक लघुशंकेचा बहाणा करुन जामकरने कार थांबवायला सांगितली. त्याने खाली उतरून स्वत:कडील मिरचीपूड रवींद्रच्या डोळ्यात टाकली. तो वेदनेने विव्हळत असतानाच मागच्या सीटवर बसलेल्या दोघांनी दोरीने त्याचा गळा आवळला. प्रेतासह ते कारमधून बीडला परतले. मास्टर मार्इंड जामकरने स्वत: कार चालवली. पोलिसांना लोकेशन सापडू नये, यासाठी त्या सर्वांनी बीडला पोहोचेपर्यंत मोबाईल सुरु करायचा नाही असे ठरवले. मात्र, जामकरने नवगण राजुरी जवळ येताच आपला मोबाईल सुरु करुन बंद केला. इमामपूर रस्त्यावर रवींद्रच्या प्रेताची त्यांनी विल्हेवाट लावली. त्याच्या मोबाईलमधील सीम काढून कारमध्येच टाकून ते पळाले होते.